‘महारेरा’कडून ५८४ प्रकल्पांना नोटीस

मुंबई दि.०९ :- महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा) आता नोंदणी झाल्यापासूनच गृहप्रकल्पांवर लक्ष ठेवणार आहे. यामुळे विकासकांवर वचक राहील, असा दावा ‘महारेरा’ने केला आहे. दरम्यान जानेवारी महिन्यात नोंदविल्या गेलेल्या नव्या प्रकल्पांपैकी ५८४ प्रकल्पांना ‘महारेरा’ ने नोटिसा बजाविल्या आहेत. रखडलेल्या वा सतत मुदतवाढ घेणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘महारेरा’ ने हे पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्र, पंजाबचे देशासाठी मोठे योगदान- राज्यपाल बैस पंजाब मधील युवकांची राज्यपालांशी भेट

जानेवारी महिन्यात ७४६ नवीन गृहनिर्माण प्रकल्प नोंदविले गेले. सुमारे २२ हजार ४४९ कोटींच्या या प्रकल्पांत ५० हजार २८८ सदनिकांची निर्मिती अपेक्षित आहे. स्थावर संपदा अधिनियमानुसार, संबंधित विकासकांनी दर तीन महिन्यांनी प्रकल्पात किती सदनिकांची नोंदणी झाली, त्यापोटी किती रक्कम जमा झाली आणि किती खर्च झाला आदी माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे.

गोराई जेट्टी आणि समुद्र किनाराही सुशोभित होणार

विकासकांनी ही माहिती, पहिला तिमाही अहवाल म्हणून २० एप्रिलपर्यंत अद्ययावत करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात नवीन प्रकल्पांपैकी ५८४ प्रकल्पाबाबत माहिती अद्ययावत झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकल्पांवर कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्या आहेत. माहिती अद्ययावत करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.