प्रधानमंत्री फसल विमा योजना

नवी दिल्ली, दि.०८ – प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत, दाखल झालेल्या विम्याचे दावे कापणीनंतर साधारणत: दोन महिन्यात विमा कंपन्यांकडून दिले जातात. त्यासाठी आवश्यक ती आकडेवारी उपलब्धता आणि संबंधित राज्यसरकारकडून योग्य वेळेत विमा हप्ता अनुदान मिळणे आवश्यक आहे. काही राज्यात आणि विभागात विम्याचे दावे उशीराने मिळत असल्याची माहिती असून संबंधित आकडेवारी मिळण्यात झालेला उशीर, आकडेवारी संदर्भात विमा कंपन्यांनी घेतलेली हरकत या सारख्या कारणांमुळे हा विलंब होत आहे.

हेही वाचा :- दर्पणकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने कल्याण – डोंबिवलीतील पत्रकारांना पुरस्कार प्रदान…

अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शेतकऱ्यांना विम्याचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी केंद्र सरकारने या योजनेसाठी कार्यात्मक मार्गदर्शक तत्वात सुधारणा केली असून 2018-19 च्या रब्बी हंगामापासून ही मार्गदर्शक तत्वे लागू होत आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email