“इंसाईड स्टोरी”!. कडोंमपा पोटनिवडणूकीत विरोधी पक्ष का झाला गायब .!!

( बालकृष्ण मोरे )

कल्याण / कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ रामबाग खडक येथे सत्ताधारी सेना भाजप युतीचे उमेदवार सचिन बासरे हे निवडणुक न होता बिनविरोध निवडणून आले.येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या प्रमुख पक्षांनी उमेदवार न दिल्याने सेनेचे सचिन बासरे हे बिनविरोध निवडणून आले.पण या राजकीय पक्षांनी उमेदवार का दिले नाहीत या बाबत कल्याण मधील नागरिकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. या पोटनिवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार भेटले नाहीत की काही सेटिंग झाले या बाबत चर्चा सुरू झाली आहे.या गोष्टीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता वेगळेच कारण पुढे आले आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचा मोठा पराभव झाला.या मुळे सर्वच विरोधक निवडणूकीच्या मैदानात उतरला घाबरत असल्याचे बोलले जात होते. या मुळे राष्ट्वादीचे जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते यांना भेटून विचारले असता त्यांनी माहिती दिली की मागील महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्वादी काँग्रेसची आघाडी होती या बाबत आम्ही काँग्रेसला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक लढणार आहोत. या मुळे आम्ही आघाडीचा धर्म पाळून उमेदवार उभा केला नाही.तर या प्रकरणी मनसेच्या शहर अध्यक्ष आलेल्या कोस्तुभ देसाई यांना या पोटनिवडणूकत उमेदवार का दिला नाही या बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मनसे पोटनिवडणूक लढवीत नाही त्या मुळे मनसे ही पोट निवडणूक लढविणार नाही,तसा आदेशच मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबांचा आहे.

या पोट निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार का दिला नाही या बाबत माहिती घेतली असता माहिती मिळाली की,ही पोटनिवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत झाला होता.हा प्रभाग इतर मागासवर्गीया साठी राखीव असल्याने येथून काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र परटोले यांनी निवडणूक लढवावी म्हणून काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय झाला होता.

ही निवडणूक लढविण्या बाबत रवींद्र परटोले यांना विचारले असता त्यांनी माहिती दिली की, वेळ कमी मिळाल्याने कागदपत्राची पूर्तता न झाल्याने आपण ही निवडणूक लढवू शकलो नाही. पण या बाबत माहिती घेतली असता रवींद्र परटोले यांच्या कडे जातपडताळणी दाखला तयार होता.त्यांचे फक्त निवडणूक प्रतिज्ञापत्र तयार करायचे होते. हे प्रतिज्ञापत्र तयार करण्या साठी एक दिवसाचा अवधी लागत असताना रवींद्र परटोले हे प्रतिज्ञापत्र परटोले का तयार करू शकले नाहीत हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

या बाबत रवींद्र परटोले यांचा निवडणूक अर्ज दाखल करण्या साठी “ब” प्रभाग कार्यालय येथे उपस्थित राहिलेले काँग्रेस कार्यकर्ते योगेश कुलकर्णी यांना विचारणा केली असता त्यांनी धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणी माहिती देताना योगेश कुलकर्णी सांगितले की, रवींद्र परटोले हे निवडणूक अर्ज भरण्यास “ब” प्रभाग कार्यालायत पोहचलेच नाहीत.या मुळे आम्ही दुसरा उमेदवार तयार केला होता पण वेळ निघून गेल्याने आम्ही अर्ज दाखल करू शकलो नाही.हे पाहता येथे काँग्रेस कडून जाणून अर्ज दाखल केला गेला नाही का येथे काही सेटिंग झाल्याने युतीतील सेनेचे सचिन बासरे हे बिनविरोध निवडून आले असा प्रश्न विचारला जात आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email