राज ठाकरेंचा खंदे समर्थक समजले जाणारे नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई दि.०३ :- मनसेचे वाहतुक सेनेचे सरचिटणीस नितिन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नितीन नांदगावकर यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेच्या पहिल्या दोन्ही याद्यांमध्ये नितीन नांदगावकर यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांनी ‘मनसे’ला जय महाराष्ट्र केलं असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :- 20 ओक्टोंबर रोजी वाशीमध्ये वीरशैव वधुवर मेळावा.

आदित्य यांचा विजयाचा मार्ग सुकर व्हावा म्हणून राज ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवार दिला नसल्याचे बोलले जात होते. मात्र त्याच राज ठाकरेंचा खंदे समर्थक समजले जाणारे नितीन नांदगावकर यांना शिवसेनेने फोडले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ‘मनसे’नं मतदारसंघ सोडला मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी ‘राज’ समर्थक फोडला असल्याची चर्चा पहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेने मनसेला मुंबईत जबरदस्त धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email