आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत नीती आयोग उद्या द्वितीय क्रमवारी जाहीर करणार
नवी दिल्ली, दि.२६ – आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत नीती आयोग उद्या द्वितीय डेल्टा क्रमवारी जाहीर करणार आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यावेळी माध्यमांना माहिती देतील. १ जून ते ३१ऑक्टोबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यांनी केलेल्या प्रगतीच्या आधारे ही क्रमवारी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल आणि मे २०१८ तील प्रगतीच्या आधारे जून २०१८ मध्ये पहिली डेल्टा क्रमवारी जाहीर करण्यात आली होती. ५ जानेवारी २०१८ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.
हेही वाचा :- अमित ठाकरेंच्या लग्नाला मोजक्यांनाच निमंत्रण; राज ठाकरेंनी सांगितले कारण ?
Please follow and like us: