LIVE UPDATE ; रुळावरून घसरले सीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे, 7 जणांचा मृत्यू

पाटणा दि.०३ – बिहारच्या हाजीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास धावत्या रेल्वेचे डबे रुळाखाली घसरले आणि मोठा अपघात झाला. जोगबनीहून नवी दिल्लीला येणाऱ्या आनंद बिहार-राधीकापूर सीमांचल एक्सप्रेसला हा अपघात झाला आहे. रेल्वेचे 11 डब्बे रुळावरून घसरले. हाजीपूर-बछवाडा रेलखंडच्या महनार आणि सहदोई स्टेशन नजिक हा अपघात झाला आहे. रेल्वेचा वेग जास्त होता आणि त्यावेळी अचानक 11 डबे रुळावरून खाली घसरले. या अपघातातमध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तर काही जण जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. दुर्घटनेचं भीषण स्वरुप लक्षात घेत त्याठिकाणी एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता रेल्वे डब्यांखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम वेगाने सुरु करण्यात आलं आहे.

हेही वाचा :- सरकार पेट्रोलियम आणि वायू क्षेत्रातील शोध संबंधी अंतर मंत्रालय समितीच्या शिफारशी लागू करणार

प्राथमिक पातळीवर सावधगिरी बाळगत दुर्घटनाग्रस्तांना घटनास्थळापासून रुग्णालयात नेण्याचं काम सुरु आहे. या दुर्घटनेची छायाचित्रं आणि व्हिडिओ पातचा त्याचं भीषण स्वरूप लक्षात येत आहे. हा अपघात नेमका का झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट असून, त्याप्रकरणी कारवाई करण्यात येण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुर्घटनेबद्दल निराशा व्यक्त करत गरजूंना सर्वतोपरी मदत केली जाण्याचे आदेश संबंधीत कार्यकारिणीला दिले आहेत. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. सोनपूर आणि बरौनी इथून घटनास्थळावर आरोग्य पथकही दाखल झाले आहेत. या रेल्वे दुर्घटनेचं कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाही. भारतीय रेल्वेकडून दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी काही दुरध्वनीक्रमांक देत मदतीचा ओघही सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.