रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे येथे रात्रीची शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम
(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.१० :- तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी एकमेव शाळा म्हणजे सारडे,उरण तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा व रायगड जिल्ह्यातील पहिले शैक्षणिक संग्रहालय निर्माण करण्याचा मान मिळविला आहे, त्याच प्रमाणे ,दप्तर मुक्त शाळा, आनंद बाजार, तळयावरची शाळा, स्मशानातील शाळा, पोपटी संमेलन, पक्षी निरीक्षण, ग्रामपंचायत भेट अश्या एकापेक्षा एक आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञान रचनावादाला सतत प्रोत्साहन देत असते.
हेही वाचा :- आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेने दिला सिड़कोला सावधानतेचा इशारा
याच अनुषंगाने सारडे शाळेत रात्रीची शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रह व तारे यांची माहिती, सूर्यमालेतील ग्रहाची माहिती,दिवस -रात्र संकल्पना, चंद्राच्या कला,ग्रहणे,चंद्राचा भरती ओहोटी संबंध, याची सखोल माहिती शाळेचे उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर यांनी दिली तसेच चंद्र व इतर ग्रह ताऱ्यांचे दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करून त्याची संपूर्ण माहिती शिक्षक सुनील नऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
हेही वाचा :- जेष्ठ नागरिकांच्या मूक आंदोलनासह राबवली सह्यांची मोहीम
चंद्रावरीळ प्रत्यक्ष खड्डे पाहून त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले या उपक्रमात विद्यार्थी स्वतः सहभागी असल्याने त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच प्रमाणे त्यांना प्रत्यक्ष कृती चा अनुभव मिळाला. या उपक्रमावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला म्हात्रे मॅडम,विषय शिक्षिका समृद्धी वर्हाडी मॅडम,शिक्षक गोपाळ म्हात्रे,शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Hits: 2