सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ‘मिनीरत्न’ विभागात एनएफडीसी विजेते

नवी दिल्ली, दि.१४ – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अर्थात एमएसएमईच्या ‘मिनीरत्न’ विभागात एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अनुसूचित जाती जमातीतील उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील संस्थांच्या अनुकरणीय कार्याचा गौरव करण्यासाठी एमएसएमईच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.

हेही वाचा :- देशभरात नैसर्गिक वायू वाहिनी जाळ्याचा विस्तार

भारतीय चित्रपट उद्योगाच्या कार्यक्षम आणि एकात्मिक विकासासाठी केंद्र सरकारने 1975 मध्ये एनएफडीसीची स्थापना केली. एनएफडीसीने आतापर्यंत 300 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली असून चित्रपटांना निधीही दिला आहे. एनएफडीसी निर्मित चित्रपटांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही पटकावले आहेत. भारतीय चित्रपट जगासमोर आणण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी एनएफडीसीचा फिल्म बाजार हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरवले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email