मनसेच्या दणक्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने जारी केला नवीन व्हिडीओ,
गोकुळधाम कुठे आहे? मुंबईत आणि मुंबईची आमभाषा ही हिंदी आहे. असा एक संवाद बापुजी चंपक लाल एका एपिसोड मध्ये म्हणताना दिसले. त्यावर मनसे चे अमय खोपकर यांनी नेमक्या याच संवादावर आक्षेप घेत हेच ते मराठीचे मारक मेहता अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांची मस्ती उतरायला लागेल असा इशाराही त्यांनी दिला होता. मनसेने आक्षेप नोंदवल्यानंतर तारक मेहता का उलटा चष्मा चे निर्मता असित कुमार मोदी यांनीही ट्विटर द्वारा स्पष्टीकरण दिले होते.
हेही वाचा :- मनसे तर्फे पाक बांगलादेशमधील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या माहिती देणाराना ५,५५५ बक्षीस
या मालिकेत चंपक चाचा भूमिकेत असलेल्या अमित भट्ट यांनी राज ठाकरे यांची लेखी माफी मागितली होती. यांनी माफीनामा लिहिले की मी आम्ही भट तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत काम करतो सदर मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारतो. या मालिकेत काम करत असताना लेखकाने दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असे माझ्याकडे चुकून बोलले गेले आहे. कारण स्क्रिप्टमध्ये असे शब्द होते तरीदेखील मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहेत आणि त्याचा मला अभिमान आहे.
हेही वाचा :- एकतर्फी प्रेमातून तरुणाचा तरुणीसमोर गोळीबार ; सुदैवाने कुणीही जखमी नाही
सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो यापुढे अशी चूक होणार नाही याची मी व्यक्तीशी दखल घेईन वरील बाब समजून घेऊन आपण मला माफ कराल अशी विनंती केली होती. यानंतर या मालिकेत काम करणारे नेता लाल या कलाकाराने व्हिडिओ जारी केला आहे ज्यात म्हटले की भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्राचा शहर मुंबई येथील स्थानिक आणि प्रचलित भाषा मराठी आहे. मुंबईने नेहमी सर्वांना समजून घेतलं सर्व भाषांचा सन्मान केला मात्र चंपक चाचणी केलेल्या फक्त त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर त्यांची आता करना पासून माफी मागतो असं सांगितले आहे.