हॉटेल बुकिंगबाबत लवकरच नवीन नियमावली
मुंबई दि.१० :- हॉटेल बुकिंगबाबत पर्यटकांची ऑनलाइन होणारी फसवणूक टाळण्यासाठी हॉटेल व्यवसायिकांकडून लवकरच हॉटेल बुकिंग बाबत नवीन नियमावली जारी केली जाणार आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टन इंडियाने याबाबत पुढाकार घेतला आहे.
महापालिका शाळेतील मुलांना श्रवण यंत्राचे वाटप
सायबर गुन्हेगारांकडून हॉटेल आणि रेस्टॉरंटची बनावट बुकिंग संकेतस्थळे तयार केली जातात. यामुळे ग्राहकांबरोबरच हॉटेलचेही नुकसान होते आणि त्यांच्या प्रतिमेलाही धक्का बसतो. त्यामुळे ही नवीन नियमावली तयार केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.