आगरी कोळी कराडी समाजाच्या वतीने 11 ऑगस्ट रोजी होणार नवीन संघटना स्थापन.

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.१० – मुंबई ठाणे पालघर रायगड या परिसरामध्ये आज झपाट्याने विकास होत असताना सर्वात जास्त येथील स्थानिक असलेल्या आगरी कोळी कराडी समाजाची जमीन शासनाने वेग वेगळ्या प्रकल्पांसाठी संपादित केली आहे. पण स्थानिक भूमीपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी समाजाचा सर्वांगीण विकास मात्र शासनाला करता आलेला नाही. आत्ता तर गावांना सुद्धा नष्ट करायच्या मार्गावर शासन आहे. आज मुंबई,ठाणे, पालघर, नवी मुंबई ,रायगड परिसरात अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या. या परिसरात औद्योगीकिकरण झपाटयाने सुरु आहे मात्र या परिसरातील भुमीपुत्र असलेल्या स्थानिकांना नोकरी मध्ये ८०% प्राधान्य असताना देखील स्थानिकांना नोकरी मिळत नाहीत.

हेही वाचा :-

त्यामुळे आज हा समाज कुठं तरी हरवत चालला आहे. आणि अशा या समाजाला एकजूट ठेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच उरण पनवेल,नवी मुंबई, रायगड जिल्हा   परिसरातील तरुण वर्ग आगरी कोळी कराडी समाजाची संघटना बांधत आहेत. ज्याचे उदघाटन रविवार दी. ११ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी 11 वा.आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे होणार आहे. ज्यामध्ये आगरी कोळी कराडी समाजावर लघुचित्रपट आणि समाजावरील गाणी तसेच संघटनेची पुढील वाटचाल दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी आगरी  कोळी कराडी समाजाने मोठ्याप्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गौरव अरुण म्हात्रे यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email