थंड हवेचे ठिकाण नेरळ ते माथेरानचा प्रवास गारेगार

रायगड दि.०९ – थंड हवेचे ठिकाण माथेरान. माथेरानला वेगळी ओळख देणाऱ्या माथेरानची राणी अर्थात नेरळ ते माथेरान मिनीट्रेन काल सकाळी ८ वाजून ५० मिनीटांनी एका वातानुकुलीत डब्‍यासह धावली. या वातानुकुलीत सेवेचे पर्यटकांनी स्‍वागत केले. माथेरानच्‍या राणीचा एक डबा वातानुकुलीत असून या डब्‍यात १६ प्रवासी बसतील अशी आसनव्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीतील उजाला गायन स्पर्धेत ओमकार इंटरनॅशनल स्कूलची बाजी

काल पहिल्‍या दिवशी डबा सजावटीच्‍या साहित्‍यांनी सजवण्‍यात आला होता. नेरळ माथेरान मिनीट्रेनच्‍या सर्वसाधारण प्रवासासाठी ७५ रूपये इतके तिकीट आहे. मात्र वातानुकुलीत डब्‍यातून प्रवास करायचा असेल तर गारेगार प्रवासासाठी ४१५ रुपये मोजावे लागणार आहेत. माथेरानच्‍या मिनीट्रेनकडे अधिकाधिक प्रवासी आकर्षित व्‍हावेत हा मध्‍यरेल्‍वेचा प्रयत्‍न आहे. त्‍यासाठी यापूर्वी माथेरानची वैशिष्‍टये आणि निसर्ग सौंदर्याची ओळख करून देणारी चित्रं डब्‍यांवर रंगवण्‍यात आली आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email