नेरळ- माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२१ :– नेरळ-माथेरान मिनी ट्रेन २२ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत पुन्हा दाखल होणार आहे. नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनमधून प्रवासाला दोन तास ४० मिनिटे लागणार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान या मार्गावरील रुळांचे मोठे नुकसान झाले होते. रुळांखालील खडीही वाहून गेल्यामुळे नेरळ ते माथेरान मिनी बंद करण्यात आली होती.

हेही वाचा :- मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड

स्थानिक नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांच्यासाठी नोव्हेंबर २०२० पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरु करण्यात आली होती.
नेरळ ते माथेरान या मार्गावरील रेल्वे रूळ आणि अन्य दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर मिनी ट्रेनची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आता
२२ ऑक्टोबरपासून मिनी ट्रेन पुन्हा सुरू केली जाणार आहे.

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन सेवा

नेरळ येथून सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि माथेरानमध्ये ११.३० वाजता पोहोचेल (दररोज)
नेरळ येखथून दुपारी २.२० वाजता सुटेल आणि माथेरानमध्ये संध्याकाळी पाच वाजता पोहोचेल (दररोज)

माथेरान ते नेरळ मिनी ट्रेन सेवा

माथेरान येथून दुपारी २.३५ वाजता सुटेल आणि नेरळ येथे संध्याकाळी ५.३० वाजता पोहोचेल (दररोज)
माथेरान येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल आणि नेरळ येथे संध्याकाळी सात वाजता पोहोचेल.

2 thoughts on “नेरळ- माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू

Leave a Reply

Your email address will not be published.