शहरी-ग्रामीण दरी सांधण्याची गरज, विकासासाठी ग्रामीण भारताकडे लक्ष पुरवण्याची गरज – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली, दि.०१ – देशाचा एकसमान विकास व्हावा, यासाठी शहरी-ग्रामीण दरी सांधण्याची गरज असून, विकासासाठी ग्रामीण भागाकडे लक्ष पुरवण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत तिसऱ्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम नवकल्पना आणि सुशासन शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपतींनी 2019 साठीचे सुशासनातील नवकल्पनांसाठीचे कलाम पुरस्कारही प्रदान केले.
हेही वाचा :- 101 पोलिसांना 2018 मधील तपास कार्यातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल, केंद्रीय गृहमंत्री पदकं जाहीर
सामाजिक दर्जाकडे न पाहता सर्वांना संसाधने, आरोग्य सेवा आणि शिक्षणाची समान संधी दिल्यामुळे शहरी-ग्रामीण दरी सांधायला मदत होईल, असे ते म्हणाले. भारताच्या विकास गाथेत तरुण पिढीने नवकल्पना आणि नवे आविष्कार यासह पुढे यावे असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. शेतकऱ्यांचे आयुष्य बदलण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नव आविष्कारांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नायडू यांच्या हस्ते 75 नवीन कलाम डिजिटल वाचनालयांचाही शुभारंभ करण्यात आला.