‘तान्हाजी’ चित्रपटाच्या निर्मात्याला जितेंद्र आव्हाडांची धमकी, म्हणाले…
मुंबई दि.२१ :- शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्र दिसून येतात. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृष्यांवर तसेच संवादांवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला असताना आता या वादात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी ट्विटवरुन या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना थेट धमकीच दिली आहे. या चित्रपटात संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी ‘फेकून’ मारलेल दाखवलंय गेलेलं. यावर आता सर्वच स्तरातून आक्षेप घेतला जातोय.
हेही वाचा :- कोर्ट नाका येथील टाऊन हॉल ठाणेकरांसाठी सुरू
आता या सिनेमाबाबत राष्ट्रवादीचे आमदार आणि जेष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलीये. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, ओम राऊत तुमच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत.
ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला , त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या अनैतिहासिक आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल.
याला धमकी समजली तरी चालेल.#TanhajiTrailer @omraut— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 20, 2019
त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल, असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही तर याला धमकी समजली तरी चालेल, असंही आव्हाड या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड या संघटनेने ट्रेलरबाबत आपला आक्षेप नोंदवला होता.
हेही वाचा :- ठाणे जिल्ह्यातील शाळांना आरटीई प्रतिपूर्तीसाठी ४ कोटी मंजूर
छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण आहे, अभिनेञी काजोलच्या तोंडी असलेले संवाद आणि महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर दाखवण्यात आलेल्या ॐ ला ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळेस पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्माता आणि प्रमुख अभिनेता असणाऱ्या अजय देवगणने “या चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली आहे,” असं आधीच स्पष्ट केलं होतं. “चित्रपटातील सर्व संदर्भ ऐतिहासिक असून यावर आम्ही बराच अभ्यास केला आहे. कोणाच्याही भावना दुखवाल्या जाणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे,” असं एका प्रश्नाला उत्तर देताना अजय देवगणने स्पष्ट केले होते.
Hits: 0