डोंबिवलीत शिवसैनिकांसह राष्ट्रवादी-काँग्रेसचा जल्लोष

डोंबिवली दि.२८ :- शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करताच. डोंबिवलीतील शेकडो राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा चौकात एकत्र जमून फटाक्यांच्या आतिष बाजी करीत पुढे वाटून जल्लोष साजरा केला. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीमधील शिवसैनिकांनी शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा चौकात जमून एकच जल्लोष केला.

हेही वाचा :- Dombivali ; गायक-संगीतकाराच्या घरात चोरी

शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेने मानपाडा रोडला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नागरिकांसह शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. तर इंदिरा चौकात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवत पेढे वाटले आणि ढोल-ताश्याच्या तालावर नाचून आनंद व्यक्त केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email