प्रा. वामन केंद्रे यांना ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ पुरस्कार जाहीर

उज्जैन येथे शनिवारी पुरस्कार वितरण

मुंबई आसपास प्रतिनिधी 


मुंबई- उज्जैन येथील अभिनव रंगमंडळाचा ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान पुरस्कार’ पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम ५१ हजार रूपये, सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

येत्या १५ ॲाक्टोबर रोजी उज्जैन येथे
होणा-या अभिनव रंगमंडळाच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात केंद्रे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या ‘मराठी रंगछटा’! – शेखर जोशी

नाट्य दिग्दर्शनातील धाडसी प्रयोग, भारतीय रंगमंचावरील रंगभाषा, आधुनिक नाट्य प्रशिक्षणातील अमूल्य योगदान आणि रंगभुमीसंदर्भात केंद्रे यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

तो मी नव्हेच’ ला साठ वर्षे पूर्ण – रवींद्र नाट्य मंदिरात आज विशेष कार्यक्रम

भारतीय समृद्ध साहित्य परंपरेतील अग्रणी महाकवी, महान नाटककार कालिदास यांच्या नगरीतून मिळणारा हा पुरस्कार माझ्यासाठी साक्षात कालिदासांचा आशिर्वाद आहे, अशी भावना प्रा. केंद्रे यांनी व्यक्त केली.

यंदा दिवाळीत ‘हर हर महादेव’! चित्रपटाची झलक सादर
—–

Leave a Reply

Your email address will not be published.