नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट पंतप्रधानांना मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव करणार
नवी दिल्ली, दि.२१ – सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत, येणाऱ्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने नवी दिल्लीने, पंतप्रधानांना देशभरातून प्राप्त झालेल्या भेटवस्तूंचा लिलाव आयोजित केला आहे. लिलावातून उभी राहणारी रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे. प्रत्यक्ष लिलाव 27 आणि 28 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्लीतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून होईल.
हेही वाचा :- 25 ते 27 जानेवारी दरम्यान राष्ट्रपती भवन आणि मुगल गार्डन जनतेसाठी बंद राहणार
त्यानंतर उर्वरित वस्तूंचा ई-लिलाव 29 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान www.pmmementos.gov.in या पोर्टलवर होईल. नवी दिल्लीतल्या जयपूर हाऊस इथल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये अशा सुमारे 1900 भेटवस्तू नागरीकांना बघण्यासाठी उपलब्ध आहेत. या भेटवस्तूंमध्ये चित्रे, शिल्पे, शाली, जॅकेटस, पारंपरिक वाद्ये इत्यादींचा समावेश आहे. www.pmmementos.gov.in या पोर्टलवर या भेटवस्तू पाहता येतील.