नाकाद्वारे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस आजपासून मुंबईत २४ केंद्रांवर उपलब्ध
मुंबई दि.२८ :- नाकाद्वारे देण्यात येणारी ‘इन्कोव्हॅक’ करोना प्रतिबंधक लस आजपासून बृहन्मुंबई महापालिकेतर्फे शहरातील २४ केंद्रांवर द्यायला सुरुवात झाल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेऊन सहा महिने किंवा अधिक काळ झालेल्या ६० वर्षे वयावरील नागरिकांना या लशीची वर्धक मात्रा घेता येणार आहे.
कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवा सुरू
१६ जानेवारी २०२१ पासून देशभरात करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानुसार मुंबईत सर्व नागरिकांचे करोना लसीकरण करण्यात आले. करोना लसीची वर्धक मात्रा १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही लशीसाठी वर्धक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नसल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.