रुग्णालयांसाठी प्रवेशस्तरीय प्रमाणपत्र प्रक्रियेत एनएबीएचकडून सुधारणा
नवी दिल्ली, दि.२१ – राष्ट्रीय रुग्णालय आणि आरोग्यनिगा संस्था मान्यता मंडळाने, प्रवेशस्तरीय प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि डिजिटल करण्यासाठी सुधारणा केल्या आहेत. सुधारित प्रक्रिया ‘HOPE-Healthcare Organizations’ या नव्या पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे. हे पोर्टल केवळ आरोग्यनिगा संस्था / लघू आरोग्यनिगा संस्था यांना केवळ प्रमाणपत्र देण्यापुरता मर्यादित नाही. तर, गुणवत्ता प्रोटोकॉल्स, रुग्णसुरक्षेत सुधारणा आणि संस्थेतील एकंदरित आरोग्यसुविधा याबाबतच्या पूर्ततेसाठी त्यांना सक्षम करण्याकरिता आहे.
हेही वाचा :- सेऊलमध्ये योनसेई विद्यापीठात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आयआरडीएआय व आयुष्मान भारत यांचे लाभ ज्या आरोग्यनिगा संस्थांना आपल्या संस्थेत उपलब्ध हवे असतील त्यांना संधी उपलब्ध करुन देण्याचा हेतू यामागे आहे. या प्रक्रियेबाबत रुग्णालयांना माहिती देण्यासाठी देशभरात कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कॉलसेंटरची व्यवस्थाही करण्यात येत आहे. रुग्णालये 1800-102-3814 या क्रमांकावर कॉलसेंटरशी संपर्क साधू शकतील किंवा hope@qcin.org वर लिहू शकतात किंवा www.hope.qcin.org या संकेतस्थळावरुन संदर्भ मिळू शकतील.
Please follow and like us: