अनाकलनीय… राज ठाकरे याना वरिष्ठ पत्रकार शेखर जोशी यांच्या खुला पत्र

शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉल वरून

भाजप- शिवसेनेला पर्याय म्हणून लोक-मतदार ‘मनसे’ कडे खरोखरच गंभीरपणे पाहात होते. राज्यात विधानसभा, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी तुमच्यावर विश्वासही टाकला. पण मतदारांनी टाकलेला हा विश्वास तुम्हाला टिकवता आला नाही. आणि आता तर शरद पवार यांच्या मागे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जाऊन तुमचीही उरलीसुरली विश्वासार्हता तुम्ही गमावून बसला आहात. हे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. तुम्ही एक वेळ मोदी-भाजप विरोध म्हणून शिवसेनेबरोबर गेला असतात तरी चालले असते.

समाजातील विश्वासार्हता गमावून बसलेल्या शरद पवार यांच्या बरोबर तुम्ही साटेलोटे केले तिथेच चूक झाली असे मला वाटते. यामुळे तुमचा जो शहरी, मध्यमवर्गीय मतदार होता तो ही दूर गेला आहे, जात चालला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील प्रश्र्न हे वेगळे असतात, मतदार दोन्हीसाठी वेगळा विचार करतो हे जेवढे खरे आहे तेवढेच केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असावे यांचाही तो तेवढाच विचार करतो हे ही सत्य आहे. शरद पवार पर्यायाने राष्ट्रवादी बरोबर साटेलोटे करण्याचा किंवा त्यांच्या बरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाण्याचा निर्णय अनेक मनसैनिक आणि चाहत्यांनाही ‘मनसे’ पटलेला नाहीये. ते आता मनसैनिक असले तरी मुळचे शिवसैनिकच आहेत. ‘हिंदू दहशतवाद’ असे म्हणणा-यांबरोबर ते कसे जातील? असो.

अजून वेळ गेलेली नाही. उघडा डोळे पाहा नीट. झालेली चूक सुधारा.

विधानसभा निवडणुकीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email