सांस्कृतीक कार्य संचालनालयाच्या नाट्यस्पर्धेत महापालिकेचे सुरक्षा रक्षक नामपल्ली यांना रौप्यपदक
मुंबई दि.१० :- बृहन्मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलातील सुरक्षा रक्षक विद्याधर नामपल्ली यांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदक मिळाले आहे. अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या हस्ते नामपल्ली यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार ध्वनिफीतीद्वारे मंत्रालयात ऐकवणार
विजय तेंडूलकर लिखित ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक कळंबोली येथील रामदास शेवाळे प्रतिष्ठानतर्फे राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आले. नाटकातील ‘सखाराम बाईंडर’ ची भूमिका नामपल्ली यांनी केली होती. नामपल्ली बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत.