30 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्‍ट्रक्‍चरल ऑडीट करण्‍याचे महापालिका आयुक्‍तांचे निर्देश

३० वर्षे किंवा त्‍यापेक्षा जास्‍त जुन्‍या इमारतींचे स्‍ट्रक्‍चरल ऑडीट करण्‍याचे आदेश आयुक्‍त गोविंद बोडके यांनी साप्‍ताहिक बैठकीत दिले. या साप्‍ताहिक आढावा बैठकीत आयुक्‍तांनी सर्व प्रभागक्षेत्र अधिका-यांना त्‍यांचे प्रभागक्षेत्राअंतर्गत असणाऱ्या ३० वर्षे किंवा त्‍यापेक्षा जास्‍त जुन्‍या इमारतींचे मालक, भोगवटादार, गृहनिर्माण सहकारी संस्‍थांचे चेअरमन यांना प्रभाग कार्यालयामार्फत नोटिसा बजावण्‍याचे निर्देश दिले आहेत.

डोंबिवली पूर्वेतील रेल्वेस्थानकानजीकच्या पाटकर रोडवरील स्कायवॉकचा जिना लवकरच होणार खुला

महाराष्‍ट्र महापालिका अधिनियमातील कलम २६५ (अ) मध्‍ये इमारतीच्‍या भोगवटा करण्‍यास परवानगी दिल्‍याच्‍या दिनांकापासून किंवा तिच्‍या बांधकाम क्षेत्राच्या किमान ५० टक्‍के इतक्‍या क्षेत्राचा प्रत्‍यक्ष भोगवटा केल्‍याच्‍या तारखेपासून (यापैकी जो आधीचा असेल) ३० वर्षाचा कालावधी समाप्‍त झाला असेले.अशा इमारतीचे मालक किंवा भोगवटादारांनी संबंधित इमारत राहण्‍यायोग्‍य असल्‍याचे ‘बांधकाम सुस्थिती प्रमाणपत्र ‘ महापालिकेकडे नोंदणी केलेल्‍या बांधकाम अभियंत्‍याकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. त्‍याअनुषंगाने अशा इमारतधारकांनी तातडीने संबधित अभियंत्‍याकडुन स्‍ट्रक्‍चरल ऑडीट करुन घ्‍यावे. जर का पावसाळयात अशा इमारतींची पडझड झाल्‍यास त्‍यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

प्रेरणादायी उद्योजक विशेषांक

गेल्यावर्षी महापालिका क्षेत्रात धोकादायक २१० आणि अतिधोकादायक १६८ असे एकूण ३७८ इमारती असल्‍याचे जाहीर केले होते. सर्वात जास्‍त १२२ धोकादायक इमारती फ प्रभागक्षेत्रात तर अतिधोकादायक ९१ इमारती क प्रभागक्षेत्रा अंतर्गत आहेत. अशा इमारतींमधील रहिवाशांनी पावसाळयापूर्वी स्‍थलांतरित व्‍हावे, जेणेकरुन कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email