मुंबई: कांदिवलीला प्रेमप्रकरणातून ३ महिलांची हत्या, एकाची आत्महत्या, रुग्णालयात मृतदेह आढळल्याने खळबळ

 

मुंबईतील कांदिवलीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एकाच कुटुंबातील ४ लोकांचे मृतदेह रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेकडील ही घटना असून यामध्ये किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी, शिवदयाळ सेन या चौघांचे मृतदेह सापडले आहेत.

यामध्ये तिघींची हत्या करण्यात आली होती तर एक गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. चालक म्हणून कामाला असलेल्या शिवदयाळ यानेच मालकीण आणि तिच्या दोन मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा संशय आहे.

या प्रकरणात पोलिसांना घटनास्थळी पाच सुसाईड नोट्स सापडल्या आहेत, त्यानुसार पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे.

चालक शिवदयाळ याचे डॉक्टर महिलेच्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. त्यामुळे त्याने तिघांची हत्या करत आत्महत्या केल्याचं एका सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे. आई आणि मोठ्या बहिणीचा प्रेमाला विरोध होता.

म्हणूनच प्रथम आई आणि बहिणाची हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन स्वत:लाही संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. तर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.