मुंबई महाराष्ट्राचीच आहे!-आचार्य अत्रे

(शेखर जोशी)

मुंबई दि.१३ – महाराष्ट्राच्या न्याय हक्कांवर जर कोणी अतिक्रमण करत असतील तर त्यांची महाराष्ट्र यापुढे बिलकूल गय करणार नाही. या प्रश्नाबाबत अत्यंत उग्र व प्रखर भूमिका या पुढे महाराष्ट्राने स्वीकारली पाहिजे तरच आपला निभाव लागणार आहे.., असे ज्येष्ठ पत्रकार आणि नाटककार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ७२ वर्षांपूर्वी ठणकावून सांगितले होते. भविष्यात काय घडू शकते, तेच जणू काही अत्रे यांनी ७२ वर्षापूर्वी ओळखले होते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर इतक्या वर्षांनंतरही मराठी आणि महाराष्ट्राच्या न्याय हक्कांबाबत हीच परिस्थिती राहणार असल्याचे भविष्यच अत्रे यांनी या लेखातून जणू काही व्यक्त केले होते. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या ‘नवयुग’ साप्ताहिकात २१ डिसेंबर १९४७ रोजी लिहिलेल्या ‘मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे’ या अग्रलेखात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने ही भूमिका मांडली होती.

हेही वाचा :- चेंजिंग रूममध्ये चित्रीकरण; मालक व नाेकर अटकेत

मुंबई वगळून महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन द्विभाषिक राज्ये निर्माण करण्याचा निर्णय काँग्रेस शासनाने घेतला होता. त्याच्या विरोधात ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी आचार्य अत्रे यांनी ‘नवयुग’मधून ठोस भूमिका घेतली होती. ‘महाराष्ट्राला कोणाच्याही हक्कांवर अतिक्रमण करायचे नाही, मात्र महाराष्ट्राच्या न्याय हक्कांवर आणि मागणीवर जे कोणी अतिक्रमण करतील, त्यांची महाराष्ट्र यापुढे बिलकूल गय करणार नाही’, असेही अत्रे यांनी या लेखात ठणकावून सांगितले होते. मुंबईतील मराठी भाषिक टक्का कमी होत चालला असल्याचे राज्य शासनानेच एका पाहणी अहवालाच्या आधारे जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात या टक्केवारीचा आधार घेऊन कदाचित मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाण्याची शक्यता असल्याची भिती आजही व्यक्त केली जाते.

हेही वाचा :- dombivali ; अभाविपच्या आवाहनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मॅजेस्टिक बुक एजन्सी’ने काही वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या ‘निवडक नवयुग’ या मासिकाच्या आकारातील पुस्तकात आचार्य अत्रे यांनी केलेले विविधांगी लेखन वाचायला मिळते. ‘नवयुग’ या साप्ताहिकातील १९४० ते १९६० या काळातील अत्रे यांनी केलेले विविध लेखन या पुस्तकात संकलित करण्यात आले आहे. याची संकल्पना, संकलन आणि संपादन अनिल कोठावळे यांचे असून ‘अत्रे गौरवांजली’ असे या पुस्तकाचे नाव आहे. यामधील ‘गांधीजींचा दीडशे फुटी पुतळा’ हा लेखही वाचनीय असून समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत सध्या होत असलेल्या राजकारणाशी त्याचे साधम्र्य असल्याचे आढळून येते. ‘दीडशे वर्षाच्या गुलामगिरीने देशात आडवे पडलेल्या माणसांचे कोटय़वधी मुडदे पायावर उभे करण्याचे काम आपण सध्या करू या, हे काम झाले की मग पुढाऱ्यांचे २०० ते ३०० फुटी पुतळे उभे करू या’, असेही अत्रे यांनी या लेखात म्हटले होते.

Ulhasnagar Dance Bar उहल्लासनगर में डांस बार चालक बेख़ौफ़ अश्लील नृत्य बेरोकटोक


Leave a Reply

Your email address will not be published.