मुकेश अंबानी आजोबा झाले

कन्या ईशा अंबानी – पिरामलची प्रसृती

मुंबई दि.२० :- उद्योजक मुकेश अंबानी आजोबा झाले असून त्यांची कन्या ईशा अंबानी- पिरामलहिने शनिवारी जुळ्या मुलांना जन्म दिला. ईशा- आनंद पिरामल यांना मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुले झाली.‌

अंबानी कुटुंबीयांकडून या जुळ्या मुलांचे कृष्णा आणि आदिया असे नामकरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाच्या किरकोळ व्यवसायाची जबाबदारी ईशा अंबानी यांच्याकडे सोपविली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.