मुजोर रिक्षाचालकांची लुट सुरूच डोंबिवली ते कल्याण ४०० रुपये रिक्षाप्रवासी भाडे

डोंबिवली दि.१९ – रविवारी सकाळी कल्याण रेल्वे पत्रीपूल तोडण्याचे काम सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ६ तासांचा मेगाब्लाँग घेतला होता. मात्र याचा फायदा डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी घेत अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात होते. परंतु वाहतूक पोलिसांनी अश्या रिक्षाचालकांवर कारवाई केली नसल्याने प्रवासीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे. डोंबिवली ते कल्याण ४०० रुपये रिक्षाप्रवासी भाडे घेत जात असून आश्चर्य म्हणजे कल्याण ते ठाणे तब्बल १८०० रुपये रिक्षा भाडे घेतले जात होते. यावर नागरिकांनी रिक्षाचालकांना जाब विचारला असता काही रिक्षाचालकांनी प्रवाश्यांशी हुज्जत घातली. तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाने याची दाखल घेतली नाही. नेहमीप्रमाणे प्रवाश्यांची लुट सुरु असताना विविध राजकीय पक्षांच्या रिक्षा युनियनने याकडे लक्ष दिले नाही.

हेही वाचा :- डोंबिवली ; रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी कल्याणात महावॉकेथॉन

मुंबईतील वडाळा येथील सीताराम मोहिते यांना कामानिमित्त कल्याणला जायचे होते. मात्र रेल्वेचा मेगाब्लाँग असल्याने त्यांना डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरावे लागले. त्यानंतर त्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांना कल्याण रेल्वे स्थानकापर्यत जाण्याचे रिक्षा भाडे विचारले. रिक्षाचालकाने ४०० रुपये रिक्षाभाडे सांगितल्यावर मोहिते यांनी रिक्षाचालकाला चांगलेच झापले. त्यानंतर डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात केडीएमटीने विशेष सेवा म्हणून सोडलेल्या बसमधून कल्याणला जाणे पसंत केले. बाजीप्रभू चौकात दोन वाहतूक पोलीस उभे असताना रिक्षाचालक प्रवाशाची लुट करत होते. मात्र प्रवाश्यांची रिक्षाचालकांविरोधात तक्रार नसल्याची सबब नसल्याचे सांगत वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे टाळले. तर इंदिरा चौकात रस्तावरचा प्रवाशाची वाट पाहत उभ्या असलेल्या रिक्षाचालकांनी रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या केल्या होत्या.मध्यंतरी रिक्षाचालकांनी प्रवाशी भाडे वाढविल्याने सुरु झालेल्या प्रवाश्याच्या ओरड वर रिक्षा युनियनने उपप्रादेशिक परिवहन विभागाला जबाबदार ठरविले होते.मात रविवारी प्रवाष्याची गैरसोय होत असल्याचे माहित असून एक दिवस अगोदर रिक्षाचालकांना आवाहन करत प्रवाश्यांची लुट करू नका असे निर्देश देणे आवश्यक होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email