मुंबई शेअर बाजारात २४ ऑक्टोबरला मुहूर्ताचे सौदे

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२२ :- लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने येत्या २४ ऑक्टोबर रोजी मुंबई शेअर बाजारात दिवाळीच्या मुहूर्ताचे सौदे केले जाणार आहेत. शेअर बाजाराचे दैनंदिन कामकाज संपल्यानंतर संध्याकाळी सव्वा सहा ते सव्वा सात या वेळेत हे सौदे केले जातील. या सौद्यांमध्ये इक्विटी, कमॉडिटी डेरिव्हेटिव्हज, करन्सी डेरीवेटीव्हज, इक्विटी फ्युचर्स अँड ऑप्शन्स आदी सर्वच गटांचा समावेश आहे.

हेही वाचा :- केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला महाराष्ट्रात पुन्हा तपासाची मुभा

दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात प्रतिकात्मक ट्रेडिंग केले जाते. या सौद्यांसाठी बाजार एक तास सुरू असतो.‌या काळात बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना दिसून येते.‌ दिवाळीतील मुहूर्तांचे सौदे सगळ्यात पहिल्यांदा मुंबई शेअर बाजाराने १९५७ मध्ये सुरू केले तर राष्ट्रीय शेअर बाजारात १९९२ मध्ये हे सौदे सुरू झाले.

One thought on “मुंबई शेअर बाजारात २४ ऑक्टोबरला मुहूर्ताचे सौदे

Leave a Reply

Your email address will not be published.