मुख्यमंत्री महोदय उत्तर द्या मध्यमवर्गीयांचा वाली कोण ?

(कर्ण हिंदुस्थानी )
आम्हाला जनतेचा जीव वाचवायचा आहे , आम्हीं विरोधकांच्या प्रश्नांना योग्य वेळी उत्तर देऊ , अशी घोषणा करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही . सामान्य जनतेला एक दमडी ची ही सवलत नाही देणारे मुख्यमंत्री म्हणून इतिहासात ह्यांची नोंद होणार आहे .

कोरोना काळात फक्त प्रसार माध्यमातून जनतेला दर्शन देणारे उद्धव ठाकरे एक असफल मुख्यमंत्री ठरलेले आहेत, ह्याच्यात काही दुमत नाही . राज्यात जेव्हां ओला दुष्काळ पडतो किंवा पाऊस पडत नाही , त्या वेळी शेतकऱ्याना कर्ज माफी ची सवलत दिली जाते . ह्या वेळी कोरोना मुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनता सरकार कडे आशेने पाहत होती की काही तरी सवलत सरकार कडून मिळेल

पण हातात भोपळा सुद्धा आला नाही . सर्वसामान्य जनता जवळ जवळ वर्ष भर घरीच होती , सर्व काम धंधे बंद होते . केंद्र सरकार कडून शिधा वाटपाच्या माध्यमातून धान्य मिळत होता .

ह्याच्या शिवाय काही मिळालेला नाही . जास्तीच गरज असेल तरीच घरातून बाहेर पडा बोलणारी सरकारला माहीत असणे गरजेचे आहे की सर्व सामान्य जनता कडधान्य घेऊन शिजवणार कशी ?

शिव भोजन व्यवस्था बद्दल उद्धव ठाकरे नेहमी बोलत आले आहेत की आम्ही गरीब जनतेसाठी मोफत शिव थाळी योजना सुरु केली आहे . पण मध्यमवर्गीय जनतेसाठी काय केला ?

ह्या बाबत कोण बोलणार ? मध्यमवर्गीय जनता काय ह्या राज्याची नागरिक नाही . किंवा सरकारच्या मनात असेल की मध्यमवर्गीय जनतेनी सुद्धा रांगेत उभे राहून शिव थाळी साठी हात पुढे करायचे .

ऑटो वाल्याना राज्य सरकार तर्फे १५०० /- रुपये आर्थिक मदत ची घोषणा केली गेली . ह्यात पण सर्व सामान्य ऑटो वाल्यांचा विचार केला गेला नाही . ज्यांच्या नावावर परमिट आहे त्यांनाच १५०० /- मिळताहेत .

जे बिचारे भाड्यानी ऑटो घेऊन चालवीत आहेत त्यांच्या साठी काय ? सर्व काही शेठ जी लोकांना द्यायचा असेल तर उद्योगपती व्हा , स्वतःला सरकार म्हणू नका .

मध्यम वर्गीय जनता त्रस्त आहे , त्यांना घरपट्टी ची सुद्धा माफी नाही , बँकां तर्फे मानसिक त्रास दिला जातोय , व्यवसाय करणारे व्यवसायिक मरणासन्न स्थितीत पोहचले आहेत ,

पण सरकार डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे . विधिमंडळात ह्याच सरकार चे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले होते की पुढचा निर्णय येई पर्यंत कुणाची विद्युत जोडणी कापली जाणार नाही ,

पण विद्युत वितरण कम्पनी वाले लोकांची जोडणी खण्डीत करीत आहेत . लोक दागिने गहाण ठेऊन विजेचा बिल भरीत आहेत .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांची सरकार म्हणजे स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेणारी सरकार आहे .

मधेच एक बातमी आली होती की कर्करोग चे जे रुग्ण आहेत त्यांना टाटा रुग्णालयात उपचार करीता आल्यावर राहण्याची सोया नसल्यामुळे , त्यांचे नातेवाईकांना फार त्रास सहन करावा लागतो . त्या साठी म्हाडा तर्फे शंभर सदनिका कर्क रुग्नाच्या नातेवाईकाना रहाण्यासाठी उपलब्ध करून मिळणार आहेत .

त्याकरिता मानवतेचा दृष्टिकोन समोर ठेवून म्हाडा तर्फे एक रुपया प्रति वर्ष ह्या दराने शंभर सदनिका टाटा रुग्णालयाला देण्यात येणार होत्या.

. पण ऐन वेळी शिवसेनेच्या शिवडी मतदार संघाचे आमदार अजय चौधरी ह्यांनी आक्षेप घेतला की आपल्या मतदार संघातील सुखकर्ता आणि विघनहर्ता ह्या पुनर्विकास इमारतीत ७०० मराठी कुटुंब राहतात

येथील १०० सदनिका कर्करुग्णांच्या नातेवाईकाना राहण्यासाठी देण्याच्या निर्णयाने येथील रहिवासी भयभीत आहेत . त्या मुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा .

कर्तव्यदक्ष ?मुख्यमंत्र्यानी ताबडतोड अंलबजावणी करून तो निर्णय रद्द केला . ह्याला काय बोलायचा ? निर्लज्ज आणि जनतेसाठी घातक सरकार म्हणजे आजची उद्धव सरकार .

केंद्र सरकार कडून मोफत धान्य पुरवठा आणि मोफत कोरोनाची लस . मग उद्धव सरकार ह्यांनी राज्य सरकार तर्फे जनतेला काय दिला ते सांगणार कोण ? माझा स्पष्ट मत आहे की महाराष्ट्रात मध्यमवर्गीयांचा वाली कोणी नाही .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email