* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना उरण विधानसभा मतदार संघातून मोठी आघाडी मिळवून देणार  – मनोहरशेठ भोईर – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना उरण विधानसभा मतदार संघातून मोठी आघाडी मिळवून देणार  – मनोहरशेठ भोईर

(विठ्ठल ममताबादे)

उरण दि.३१ – येणा-या लोकसभा 2019 च्या निवडणूकीत मावळ लोकसभा मतदार संघाचे शि‍वसेना-भाजपचे आर. पी. आय चे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना उरण विधानसभा मतदार संघातून मोठी आघाडी मिळवून देणार असे प्रतिपादन शि‍वसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख व आमदार मनोहरशेठ भोईर हयांनी व्यक्त केले.  लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील शि‍वसेनेच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अंगीकृत संघटनेचे पदाधि‍कारी व शिवसैनिक हयांची सभा शिवसेना शाखा नविन शेवा येथे दिनांक 29 मार्च 2019 रोजी आयोजित केली होती.  या वेळी  मार्गदर्शन करतांना आमदार मनोहरशेठ भोईर पुढे म्हणाले की सलग पांच वर्ष पांच वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणारे ते एकमेव खासदार आहेत. आपल्या खासदारकीच्या पांच वर्षाच्या कालावधीत त्यांनी उरण तालुक्यातील महत्वाचे प्रश्न सोडविले.  हया मध्ये उरण शहरातील सेफ्टी झोनचा प्रश्न, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा साडेबाराचा प्रश्न, उरण, पनवेल व कर्जत साठी पनवेल शहरामध्ये पासपोर्ट कार्यालय आणण्यासाठी केलेल प्रयत्न, बांधपाडा गावाला विकासात्मक दत्तक घेऊन त्या गावचा कलेले विकास व उरण तालुक्यात औदयोगीक क्षेत्रात केलेले कार्य, इ. असे विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. 

त्यामुळे त्यांच्या समोर कोणीही उमेदवार असला तरी मावळ लोकसभा मतदार संघाचे शि‍वसेना-भाजपचे उमेदवार खासदार अप्पा बारणे बहुमताने निवडून येतील व पंतप्रधान नरेंद्र मोदी हयांचे हात बळकट करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  तसेच येत्या 2 एप्र‍िल 2019 रोजी शिवसेना-भाजपचा मेळावा जेएनपीटी उरण मल्टीपरपज हॉल येथे संध्याकाळी 4 वाजता आयोजित केला आहे, तरी सदर मेळाव्यास पदाधिकारी व कार्यकत्यांनी मोठया संख्येन उपस्थ‍ित रहावे असे आवाहन त्यांनी केले.   नवीन शेवा येथे आयोजित केलेल्या सदर सभेची प्रस्तावना तालुका प्रमुख संतोष ठाकूर हयांनी केली. तसेच हय सभेस उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, जिल्हा परीषद सदस्य विजय भोईर, प.स. सदस्य हरीजी घरत व विभागप्रमुख भूषण ठाकूर हयांनी मार्गदर्शन केले.  हया सभेसाठी उप-तालुका प्रमुख जयवंत पाटील, प्रदीप ठाकूर, मधुसूदन म्हात्रे, विभागप्रमुख कमलाकर पाटील, संदेश घरत, माजी सरपंच जे.पी. म्हात्रे, शहर प्रमुख विनोद म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, समीर मुकरी, नगरसेविका वर्षा पाठारे, महिला आघाडीच्या ममता पाटील, ज्योती म्हात्रे, सुजाता गायकवाड, विणा तनरेजा, प्रणिती म्हात्रे, शहर संघटक महेश वर्तक, प्रविण मुकादम, उप-शहर प्रमुख कैलास पाटील, अरविंद पाटील, प्रविण थळी, तसेच उप-विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, गट प्रमुख, बुथ प्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगीकृत संघटनेचे पदाधि‍कारी व शि‍वसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.  सभा यशस्वी करण्यासाठी नविन शेवा शाखेचे शाखा प्रमुख शैलेश भोईर, अशोक म्हात्रे, सुरेश पाटील, प्रकाश म्हात्रे, तुलसीराम म्हात्रे व शिवसैनिकांनी भरपूर मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *