सर्वाधिक महिला मतदार कल्याण पश्चिममध्ये
ठाणे दि.०२ – भारत निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून ठाणे जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत. यामध्ये ३३ लाख २१ह्जार ७५८ पुरुष, २७ लाख ७० हजार ९४९ महिला त्याचप्रमणे तृतीयपंथी ३४०, अनिवासी भारतीय ४०, सर्विसेसमधील १२२१ अशा मतदारांचा समावेश आहे अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर यांनी दिली.
हेही वाचा :- डोंबिवली ; जागतिक कॅन्सर डे निमित्त “उम्मीद” चे आयोजन !
यामध्ये सर्वाधिक ऐरोली मतदारसंघ ४ लाख ३४ हजार ९३५, मीरा भाईंदर ४ लाख 42 हजार २७९, कल्याण पश्चिम ४ लाख २८ हजार ८१४, ओवळा माजिवाडा ४ लाख २१ हजार ११८, कल्याण ग्रामीण ४ लाख ३ हजार २०, मुरबाड ३ लाख ७८ हजार ५३०, बेलापूर ३ लाख ६८ हजार ५४३, मुंब्रा कळवा ३ लाख २८ हजार 450, अंबरनाथ ३ लाख २ हजार ५४६, कल्याण पूर्व ३ लाख ३३ हजार ९७१, डोंबिवली ३ लाख ३८ हजार २१७, कोपरी पांचपाखाडी ३ लाख 42 हजार ७९३, ठाणे ३ लाख १८ हजार ६७, भिवंडी २ लाख ७९ हजार ३४०, शहापूर २ लाख ४४ हजार ९०, भिवंडी पश्चिम २ लाख ६४ हजार ६७८, भिवंडी पूर्व २ लाख ६३ हजार ६७, उल्हासनगर २ लाख २१ हजार ८५० अशी संख्या आहे. ३४० तृतीयपंथी यांची नोंदणी असून सर्वाधिक ८१ नोंदणी कल्याण पूर्व, भिवंडी पश्चिम ७०, कल्याण ग्रामीण ५५ , ऐरोली २५ अशी आहे.