केंद्र सरकारच्या ई-मार्केट पोर्टलवर 12 हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे व्यवहार
नवी दिल्ली, दि.२५ – केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सरकारच्या ई-मार्केट पोर्टलची 5 सप्टेंबर 2018 रोजी सुरुवात केली होती. त्या पाठोपाठ 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ही योजना सुरु झाली.
या पोर्टलविषयी जागृती करण्यासाठी केंद्र सरकारने 6 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून, ई-मार्केटप्लेस पोर्टल म्हणजे “जी ई एम” चा वापर वाढवण्याचा सरकारचा हेतू आहे.
या काळात, कार्यशाळा, रोड-शो, प्रशिक्षण, कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्थांकडून पोर्टलच्या माध्यमातून विविध वस्तूंची खरेदी व्हावी यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच विविध विभागातील वस्तूंसाठी उत्पादक आणि विक्रेत्यांची नोंदणीही सुरु आहे.
हे पोर्टल सुरु झाल्यापासून दोन वर्षांच्या काळात या पोर्टलवरुन 12,239 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे 8 लाख व्यवहार झाले आहेत. सरकारला आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी हे एक मुक्त, पारदर्शक आणि प्रभावी व्यासपीठ आहे. आतापर्यंत 27.9 हजार खरेदीवर संघटना आणि 1.43 लाखाहून अधिक विक्रेत्यांनी यावर नोंदणी केली आहे.