मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत

मुंबई दि.०५ :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने दहा महिन्यांत ८ हजार १९२ रुग्णांना एकूण ६० कोटी ४८ लाख रुपयांची मदत दिली आहे. जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख रुपयांची मदत कक्षाकडून देण्यात आली.

ठाणे ते बोरिवली प्रस्तावित भूमिगत मार्ग; निविदेसंदर्भात आक्षेप घेणारी एल. ॲण्ड टी.ची याचिका फेटाळली

नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख,डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७ रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख तर एप्रिल मध्ये विक्रमी १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.