10 हजारांहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र कार्यान्वित

नवी दिल्ली, दि.२३ -‘आयुष्मान भारत’ अंतर्गत पहिल्या आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगढमधल्या बिजापूर इथल्या जांगला इथे 14 एप्रिल 2018 रोजी केले होते. तेव्हापासून 10,252 आरोग्य आणि कल्याण केंद्र कार्यान्वित झाली आहेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ यात आघाडीवर असून, आंध्र प्रदेशात 1,361 आरोग्य आणि कल्याण केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आयुष्मान भारत योजनेद्वारे सध्या अस्तित्वात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे, आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये रुपांतर करुन मातृ आणि शिशु आरोग्य सुविधा, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांचा इलाज, वृद्धांचे आरोग्य, तसेच मोफत अत्यावश्यक औषधे आदी सुविधा दिल्या जातील.

हेही वाचा :- कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत महावितरणच्या पुरूष व महिला कबड्डी संघाला कांस्यपदक

आयुष्मान भारत योजनेनुसार शहरी भागात दर 10 हजार लोकसंख्येमागे 4-5 आशा कार्यकर्ता एका मल्टि-पर्पज कार्यकर्ता (महिला) हिच्या मदतीने प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरवतील. यासाठीचा प्रशिक्षण कार्यक्रम IGNOU आणि राज्यस्तरावरच्या आरोग्‍य विद्यापीठांच्या द्वारे चालवण्यात येईल. या आरोग्य आणि कल्याण केंद्रामध्ये 30 वर्ष आणि त्यावरील 1,33,84,332 महिला आणि पुरुषांची असंसर्गजन्य सामान्य आजारांसाठी चाचणी झाली आहे. आयुष्मान भारत हे भारताचे सार्वत्रिक आरोग्य योजनेकडे उचलले पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.