सरकार आणि सहकारापेक्षा संस्कार महत्वाचे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कल्याण :- सरकार आणि सहकार या दोन्ही क्षेत्रांपेक्षा आपल्या दृष्टीने संस्कारांना अधिक महत्व असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी रविवारी कल्याणात बोलताना केले. कल्याण जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या संचालक समाजसेवा पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आजच्या काळात बँक उघडणे म्हणजे दोन्ही हातांनी केवळ लुटणे असेच समजले जाते.

हेही वाचा :- Dombivali ; सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत भुताटकीचा फेरा

मुंबईतील एका मोठ्या सहकारी बँकेबाबत झालेल्या प्रकरणानंतर तर लोकांमध्ये बँकांबद्दल अविश्वासाचे ढग आणखीच गडद झाले असल्याचे ते म्हणाले. तर सरकारी असो की खासगी सर्वत्र भ्रष्टाचाराच्या वाळवीने देशाला पोखरून काढल्याची खंत व्यक्त करीत अशा परिस्थितीत कल्याण जनता सहकारी बँकेचे काम अत्यंत आदर्शव्रत असल्याचे गौरवोद्गारही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी काढले.

हेही वाचा :- डोंबिवलीकरांना मिळणार घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस

याच दरम्यान व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी, कृष्णालाल धवन यांना बँकेतर्फे राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींनी पुरस्काराची सर्व रक्कम पुन्हा बँकेकडे सुपूर्द केली. या सत्कार सोहळ्याला खासदार कपिल पाटील, बँकेचे अध्यक्ष ऍड. सुरेश पटवर्धन, पुरस्कार निधीचे लक्ष्मीकांत उपाध्याय, उपाध्यक्ष मधुसूदन पाटील, सचिव मोहन आघारकर, कोषाध्यक्ष निशिकांत बुधकर, बँकेचे सीईओ अतुल खिरवडकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email