मार्च 2019 महिन्यातील पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादनाचा अहवाल
नवी दिल्ली, दि.२६ – मार्च महिन्यात देशात कच्च्या तेलाचे उत्पादन 2854.32 टीएमटी इतके होते. हे उत्पादन उद्दिष्टाच्या तुलनेत 12.99 टक्के कमी तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 टक्के कमी आहे. मार्च महिन्यात देशात नैसर्गिक वायू उत्खनन 2815.96 एमएमएसटीएम इतके होते.
मार्च 2018 च्या तुलनेत हे उत्पादन 1.20 टक्के अधिक असले तरी उद्दिष्टाच्या तुलनेत 8.99 टक्के कमी आहे. एप्रिल 2018 ते मार्च 2019 या वर्षात नैसर्गिक वायूच्या उत्खननात किंचित म्हणजे 0.69 टक्के वाढ झाली आहे.
Please follow and like us: