मोदी… सोडत नाहीत, करण्यास बाध्य करतात

 

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी वरून तोंडावर पडलेल्या सूत्रांनी स्वतःला सावरून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या नावांचे पतंग उडवले होते. पुरोगामी-सेक्युलर सूत्रांना अश्या नियुक्त्या जात-पंथ-भाषा यावरून करण्यात लिबरल समाधान मिळत असते.

अश्या संवैधानिक पदाच्या निवडीची चर्चा ही निवड करतानाची राजकीय स्थिती, सत्तारूढ पक्षाची स्थिती, घडून गेलेली एखादी मोठी घटना, आगामी काळातील संभाव्य घटना, पक्षांतर्गत समतोल, एखाद्याची सोय यातून करण्याची सवय ही काँग्रेसची कार्यपद्धती होती. सूत्रांना अंदाज बांधताना हीच पद्धत सोईची वाटत आहे.

हे ही वाचा – राजकारण आहे ! हे असे होणारच।

यालाच शोध पत्रकारिता असे सध्या म्हटले जात आहे. काही चालवलेल्या नावांपैकी एका नाव नक्की होते. त्यामुळे सूत्र कॉलर ताठ करून फिरण्यास मोकळे होतात. आम्ही सांगितले होते असे सांगत सुटतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या सूत्रांना आपला गृहपाठ पुन्हा पुन्हा करण्यास बाध्य करत आहेत. सूत्रांचे सोर्स खात्रीलायक नाहीत हे सिद्ध होत आहेत. असे सोर्स आता सक्रिय नाहीत. आपण मीडिया फ्रेंडली आहोत हे दाखवून देण्यासाठी आणि पक्षातील सगळ्याच खबरी आपल्याला असतात हे माध्यमात ठसवत आपली स्पेस निर्माण करण्यासाठी बातम्या दिल्या जातात.

हे ही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेड्युलमध्ये नसलेली गळाभेट

राजधानी दिल्लीच्या वर्तुळात हे होते. ल्युटन्स पत्रकारांना अश्या बातम्या पुरवण्याची एक व्यवस्था होती. यातून काही ठराविक नाव चालवली जायची. जो इच्छुक असायचा तो यासाठी विशेष पुढाकार घ्यायचा. पीआर चा तो एक प्रकार होता.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी हा नाव चालवण्याच्या खेळाला आणि पीआरच्या उद्योगाला चाप लावल्याने सूत्र धाडकन पडत आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचे तेच झाले आहे. मुसलमान, शीख, ख्रिश्चन यासह दक्षिण आणि कोकण असे चित्र रंगवले गेले. मुख्तार अब्बास नक्वी, सुरेश प्रभू अश्या नावांवर चर्चा झाली. रा.स्व.संघाचे शताब्दी वर्ष लक्षात घेऊन नाव नक्की केले जाईल असा एक अजब तर्क मांडला गेला.

आणि अखेर सूत्रांच्या चर्चेत नसलेले, ल्युटन्स मीडिया शोधू न शकलेले नाव उपराष्ट्रपतीपदासाठी निश्चित केले गेले. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. जगदीप धनखड यांच्या नावाची घोषणा होताच सूत्र गडबडून गेले आहेत. मोदी यांनी चकवले म्हणून अस्वस्थ झाले आहेत.

मोदी बातमी सोडत नाहित. बातमी करण्यास बाध्य करतात. मोदी बातमी चालवण्यासाठी प्रवृत्त करतात.
मोदी द्वेषाचे तुणतुणे वाजवणाऱ्यांना बातमी चालवण्याशिवाय पर्याय नाही.

उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार रा.स्व.संघाचे स्वयंसेवक नाहीत. अभाविपचे कार्यकर्ते नाहित. या दोन्ही संघटनांचे हितैषी असलेले जगदीप धनखड हे मूळचे जनसंघाचे नाहित. राजस्थान येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले जगदिप धनखड हे विधीज्ञ आहेत. संविधानाचे जाणकार आहेत. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.

हे ही वाचा – चहावाला ते रिक्षावाला व्हाया चौकीदार

झुंनझुंन येथून ते खासदार म्हणून निवडून आले होते. थोडी काँग्रेसची आणि काहीशी जनता दलाची पार्श्वभूमी असलेले जगदीप धनखड हे नव्वदच्या दशकात भाजपात आले. भाजपात रुळले. अनेकांना त्यांनी भाजपाशी जोडले. पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सर्वसामान्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीनंतरच्या हिंदू विरोधी हिंसाचाराच्या विरोधात स्वतःचा जीव धोक्यात घालून ते हिंसाचार ग्रस्त भागात गेले होते. पुढाकार घेऊन अत्याचारग्रस्त हिंदूंच्या पुनर्वसनासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. सर्वसुविधायुक्त राज्यपाल निवास सोडून त्यांनी जनतेशी संवाद साधला होता. संवाद करण्याची, आधार देण्याची आणि ठामपणे उभे रहाण्याच्या जगदिप धनखड यांच्या या कृतीने त्यांची उपराष्ट्रपती निवड करणे सोपे झाले असावे. राज्यसभेचे कामकाज जगदिप धनखड खमकेपणाने चालवतील असा विश्वास वाटणे स्वाभाविक आहे.

मकरंद मुळे यांच्या फेसबूक वॉल वरून साभार 

Leave a Reply

Your email address will not be published.