मोदी सरकारने ‘फेसबूक’ला पर्याय स्वदेशी अ‍ॅप विकसित करावे ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगणा

        आज देशातील हिंदुत्ववादी संघटनांना सोशल मिडिया चालवणार्‍या विदेशी आस्थापनांकडून लक्ष्य केले जात आहेफेसबूककडून त्यांची पाने बंद केली जात आहेततर ट्विटरकडूनही भारताच्या उपराष्ट्रपतींचेतसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अधिकृत खात्याचे ‘ब्ल्यू टीक’ काढले जाते. ‘सुदर्शन न्यूज’सारख्या वाहिनीचेही पान बंद केले जातेमी लोकप्रतिनिधी असतांनाही माझे फेसबूकवर खाते उघडण्यावर बंदी घातली गेली आहेदुसरीकडे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा डॉझाकीर नाईकहिंदूंना संपवण्याची भाषा करणारे अकबरूद्दीन ओवैसीपाकिस्तानमधील अनेक आतंकवादी संघटना यांची मात्र फेसबूकट्वीटर आदि समाजमाध्यमांवरील खाती राजरोसपणे चालू आहेतदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झालीतरी आपल्यावर विदेशी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य करीत आहेतमाझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे कीआपण कधीपर्यंत विदेशी ‘फेसबूक’ला हजारो कोटी रुपये कमवून देणार आहोत ? ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर भारत सरकारने फेसबूकप्रमाणे स्वदेशी अ‍ॅप विकसित केले पाहिजेअसे आवाहन भाजपचे तेलंगणा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ आमदार श्रीटीराजासिंह यांनी केले

       ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘फेसबूकचा हिंदुद्वेष’या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त ते बोलत होतेहा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ Hindujagruti.org, यूट्यूब आणि ट्वीटर यांवर 8,684 लोकांनी पाहिलाया विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन ट्विटरवर #Facebook_Suppress_Hindu_Voices या नावाने चालवलेल्या टे्रंडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालायात 72 हजार ट्वीटस् करून नागरिकांनी फेसबूकचा निषेध केलाफेसबूकवरील या अन्याय बंदीच्या विरोधात हजार लोकांनी ऑनलाईन पिटीशन साईन केली.

आता फेसबूकवरच भारत सरकारने बंदी आणावी ! – सनातन संस्था

         या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्रीचेतन राजहंस म्हणाले की, ‘टाइम’सारख्या विदेशी प्रसिद्धीमाध्यमाने अहवाल दिला म्हणून फेसबूकने सनातन संस्थासनातन प्रभातसनातन शॉप यांच्यासह अनेक फेसबूक पाने बंद केली आहेतकोणतेही ठोस कारण नसतांना भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात हस्तक्षेप करून अशा प्रकारे निवडक पाने बंद केली जात असतीलतर फेसबूकवरच सरकारने बंदी आणावीअशी आमची मागणी आहे.

       या वेळी बोलतांना ‘भारत जागृती सोशल नेटवर्कींग ग्लोबल साईट’चे संस्थापक श्रीभारत भूषण म्हणाले कीकेवळ हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या पानांना प्रतिबंधीत गेले जातेदुसरीकडे ख्रिस्त्यांच्या चंगाई सभेची पाने विना अडथळा धर्मांतराचे काम करत आहेत. ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्रीसुनील घनवट म्हणाले कीडेटाचोरीप्रकरणी अमेरिकी न्यायालयात दंड भरून माफी मागणारे फेसबूकचे मार्क जुकेरबर्ग यांनी प्रथम लष्करतोयबापासून अनेक आतंकवादीनक्षलवादी यांची चालू असलेली फेसबूक खाती बंद करण्याची हिंमत दाखवावी भारतात पैसे कमवण्यासाठी आलेली विदेशी आस्थापने आमच्या विचारलेखन स्वातंत्र्यावर बंदी कशी काय आणू शकतात ?  

Leave a Reply

Your email address will not be published.