मोबाईल चोराची धुलाई
कल्याण दि.३१ :- कल्याण पूर्वेतील संतोष नगर येथे राहणारे उत्तम चिंतामण हरड (35) हे म्हसोबा चौक येथून हातात मोबाईल घेवून गाणी ऐकत पायी चालत जात होते. त्यावेळी सोहम सलीम मलिक (19) याने पाठीमागून येत मोबाईल चोरी करून नेला. नागरिकांनी पाठलाग करून पकडलेल्या या चोरट्याला यथेच्छ झोडपून पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :- Kalyan ; मोटारसायकल चोऱ्या वाढल्या