डोंबिवलीत कामानिमित्त आलेल्या तरुणाच्या मोबाईलसह पर्स लांबविले
Hits: 0
डोंबिवली दि.२६ :- मुंबईतील घाटकोपर येथे राहणारा तरुण कामानिमित्त आपल्या गाडीने डोंबिवलीत आला होता. दावडी येथील मयूर बार समोरील रस्त्यावर गाडी उभी करून थांबला असता पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने गाडीतील मोबाईल आणि १५ हजार रुपयांची रोकड असलेली पर्स चोरून पसार झाले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीत सोनसाखळी चोरी