मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला?; राजू पाटील म्हणतात…

मुंबई दि.३० :- मनसेचे एकमेव नवनिर्वाचित आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीणमधून विजय मिळवला. यानंतर त्यांना ते कोणाला पाठींबा देणार याबाबत विचारण्यात आलं. यालाच उत्तर देत राजू पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरुन त्यांच्या आदेशाप्रमाणे योग्य तो निर्णय घेईल, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सात दिवस झाले तरी अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही.

हेही वाचा :- लक्ष्मी पूजनसाठी घरी जात असताना भिवंडी -वाडा रस्त्यावर खड्डयांमुळे दुचाकीस्वाराचा बळी

याच पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. सत्तेच्या वाटाघाटीत आपलं सामर्थ्य वाढावं यासाठी दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवताना दिसत आहेत. त्यातच मनसेचे एकमेव आमदार प्रमोद (राजू) पाटील यांना तुमचा पाठिंबा कोणाला असणार असं विचारले असता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेला अनुसरुन त्यांच्या आदेशाप्रमाणे योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :- रेल्वे विभागातली दिव्यांगजनांसाठीची रिक्त पदे कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या संवर्गातून भरली जाणार नाहीत

राजू पाटील यांचा 2014 मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यंदा विधानसभेसाठी त्यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागली. अत्यंत कमी दिवसांत त्यांनी हायटेक प्रचार केला. सोशल मीडियावर ते प्रभावी ठरले. बदल हवा आहे, अशी त्यांच्या प्रचाराची टॅगलाइन होती. कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी त्यांना कौल दिला होता.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email