Kalyan live updates ; मनसेने खाते उघडले राजू पाटील विजयी

Hits: 0

डोंबिवली दि.२४ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद पाटील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा पराभव केला. सक्षम विरोध पक्षासाठी मनसेला मतदान करण्याचे आवाहन अध्यक्षराज ठाकरे यांनी केले होते. मात्र, प्रमोद पाटील यांच्या रुपाने मनसेला पहिला आमदार मिळाला आहे. प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा सुमारे ५ हजार मतांनी पराभव केला. तर वंचित बहुजन आघाडीचे अमोल केंद्रे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

हेही वाचा :- ताज्या बातम्या न साठी whatsapp grup join करा

विधासभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा १८ व्या फेरीपर्यंत शिवसेनेचे रमेश म्हात्रे आघाडी राखून होते. मतमोजणीच्या २५ व्या फेरीलाही रमेश म्हात्रे यांना २१७ मतांची आघाडी होती. मात्र, यानंतर २८ व्या फेरीला जोरदार मुसंडी मारत प्रमोद पाटील यांनी सुमारे ५ हजार मताधिक्याने विजय संपादन केला. प्रमोद पाटील यांना ८६,२३३, तर रमेश म्हात्रे यांना ८०, ६६५ मते मिळाली. दरम्यान, सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरे करत होते.

हेही वाचा :- Live News ; पंतप्रधान प्रमाणेच फडणवीस यांनी निकाल येण्यापूर्वी दिली केदारनाथ मंदिराला भेट

राज ठाकरेंनी सर्व सभांमधून हीच भूमिका मांडली. या विधानसभा निवडणुकीत १०० हून अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, प्रमोद पाटील यांच्या विजयामुळे मनसेचे इंजिन केवळ एकाच मतदारसंघात विजयी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदानानंतरच्या सर्वच एक्झिट पोलमधून मनसेची धूळधाण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या निकालानंतर तो खरा ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण ग्रामीणचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही मतदारसंघात मनसेला मोठ्या प्रमाणात आघाडी घेता आलेली नाही

Leave a Reply

Your email address will not be published.