एमएमआरडीए’च्या बैठकीत विविध प्रकल्प मेट्रो,रस्ते,वाहतूक प्रकल्पांना मान्यता

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२० :- मुंबई महानगर प्रदेशातील नागरीकांसाठी पायाभूत सुविधांचे प्रकल्प मेट्रो, रस्ते, दळणवळण, वाहतूक सुधारणा सुधारण्याच्या दृष्टीने तसेच नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय ‘एमएमआरडीए’च्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आले. मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगिण विकासासाठी ‘एमएमआरडीए’ सदैव कार्यरत असून मुंबई महानगराच्या विकासाला गती देण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे वेळेपूर्वी करावी, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले.‌

हेही वाचा :- अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

एमएमआरडीएची १५३ वी बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणण्याकरीता प्राधिकरणामार्फत महत्वाकांक्षी मेट्रो मार्गिका हाती घेण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाच्या प्रगतीपथावर असलेल्या आणि प्रस्तावित मेट्रो मार्गिकांपैकी एकूण ९ मेट्रो मार्गिकांसाठी निधी (कर्ज) उभारण्याकरीता भारत सरकारचा उपक्रम असलेल्या मे. आर.ई.सी. लिमिटेड यांनी एकूण ३०,४८३ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. या कर्जाच्या करारपत्रांवर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

हेही वाचा :- संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ डोंबिवलीत पुन्हा अवतरणार!

मुंबई, ठाणे व नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच या शहरांचा विकास करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या प्रस्तावित प्रकल्पांच्या कामाकरीता १७ हजार २१४.७२ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे. सदर प्रकल्पांचा सुसाध्यता अहवाल (FeasibilityReport) व सविस्तर प्रकल्प अहवाल (Detail Project Report) करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. पूर्वद्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील तीन हात नाका येथे वाहतूक सुधारणा प्रकल्पांसाठीच्या अपेक्षित (अंदाजपत्रकीय खर्च) २८९.१२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच भिवंडी वाडा राज्यमार्ग क्रमांक ३५ वरील विश्वभारती नाका, मिनार ते वडपे या रस्त्याच्या बांधकामासाठीच्या १४३ कोटी रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.

हेही वचा :- यंदा ९ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम?

अंबरनाथ नगरपरिषद, कुळगांव बदलापूर नगरपरिषद आणि उल्हासनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्राधिकरणामार्फत राबविण्यास व या प्रकल्पास प्राधिकरणामार्फत व्यवहार्यता तफावत निधी (VGF) उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.