भारतीय रेल्वेच्या वारशाबाबत जनजागृती करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केल्या ‘डिजिटल स्क्रीन्स’ 22 स्थानकांवर डिजिटल स्क्रीन्स आणि क्यूआर कोड आधारित पत्रके

नवी दिल्ली, दि.१६ – क्यूआर कोडचा वापर करून रेल्वे स्थानकांवर डिजिटल संग्रहालय निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने यंदाच्या स्वातंत्र्यदिनापासून 22 स्थानकांवर डिजिटल स्क्रीन्स उभारल्या आहेत. रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वाराशी डिजिटल एलईडी स्क्रीनवर एक-दोन मिनिटांच्या चित्रफितीद्वारे रेल्वेचा ठेवा उलगडून दाखवणे हा यामागचा उद्देश आहे.

या चित्रफितीमध्ये वारसा इमारती, रेल्वे इंजिने तसेच रेल्वेच्या समृद्ध वारशाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सध्या नवी दिल्ली, हजरत निजामुद्दीन, हावडा, सिलडाह, जयपूर, आग्रा, कोईमतूर, लखनौ, वाराणसी इत्यादी स्थानकांवर डिजिटल स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत.

याशिवाय या स्थानकांवर क्यूआर कोड आधारित पत्रकेही लावण्यात आली आहेत. हे क्यूआर कोड स्कॅन करून प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर रेल्वेची माहिती देणारा व्हिडिओ पाहता येईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email