केरळमधल्या पूरग्रस्तांना मदतीसाठी रेल्वेची सर्वतोपरी मदत

नवी दिल्ली, दि.२२ – केरळमध्ये झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे ३६ रणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे दक्षिण रेल्वेच्या तीन विभागांना फ्लॅश फ्लड, भूस्खलन, रुळावर दरडी कोसळल्याच्या संकटांना सामोरे जावे लागले. रेल्वेच्या पथकाने अहोरात्र निष्ठेने काम करून केरळमधल्या मुख्य मार्गावरचे सर्व विभाग २० गस्टपासून सुरू केले. मुख्यालय आणि विभागीय पथकात ३० धिकारी, ४५ परवायझर आणि साडेचारशे रेल्वे कर्मचाऱ्यांनी यासाठी अथक परिश्रम केले.

हेही वाचा :- केरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटींचे अर्थसहाय्य, तातडीने अन्नपुरवठा करणार

अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी तिरुवनंतपुरम आणि पलक्कड विभागत ६१ शेष प्रवासी गाड्या चालवण्यात येत आहेत तर मदुराईमार्गे एर्नाकुलम ते तिरुवनंतपुरम दरम्यान १३ शेष एक्स्प्रेस गाड्या सोडण्यात आल्या.आयआरसीटीसीकडून तिरुवनंतपुरम विभागामार्फत तीन लाख रेल्वे नीर बाटल्या केरळला पुरवण्यात येत आहेत.

रेल्वेने केरळच्या मदतीसाठी छत्तीसगडकडून पुरवला गेलेला विविध सरकारी आणि नामवंत संस्थांनी पुरवलेल्या मदत सामग्रीची विनाशुल्क वाहतूक केली. णी शुद्ध करण्यासाठीची यंत्रणा, वैद्यकीय मदत यासह इतर आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी दक्षिण रेल्वेने मदतीचा हात पुढे केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email