वर्ष 2025 पर्यंत 14.4 लाख प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आरोग्य मंत्रालयाचा इग्नूसोबत करार

नवी दिल्ली, दि.25 – अल्पकालावधीच्या आरोग्यनिगा अभ्यासक्रमांना चालना देण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज इग्नू अर्थात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासोबत करार केला. स्वाक्षरी समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान होते.

या करारांतर्गत खास करुन आरोग्य क्षेत्रासाठी 10 अभ्यासक्रमांचा अभ्यास आखण्यात आला आहे. यातून वर्ष 2025 पर्यंत 14 लाखांहून अधिक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे नड्डा यांनी सांगितले.

आरोग्य निगा क्षेत्रातील मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य ही तीन मंत्रालये एकत्र येत आहेत, हा ऐतिहासिक क्षण असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

Hits: 6

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email