संरक्षण मंत्रालयातर्फे एरो शो चे आयोजन
नवी दिल्ली, दि.१० – सरकारने २० ते २४ फेब्रुवारी २०१९ दरम्यान बंगळुरू येथे एरो इंडिया २०१९ चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाच दिवसात संयुक्तरित्या मोठ्या प्रमाणावर एरो स्पेस आणि संरक्षण उद्योगांतर्फे सार्वजनिक उपक्रमांसह व्यापार प्रदर्शन तसेच एरो शो आयोजन करण्यात येणार आहे. एरो स्पेस उद्योगातील मोठे गुंतवणूकदार आणि जागतिक पातळीवरील नेतृत्व करणाऱ्यांव्यतिरिक्त जगभरातून या शो मध्ये अनेक वैचारिक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. एरो शो चे आयोजन म्हणजे माहितीची देवाणघेवाण, नव विकासासाठी तसेच नागरी उड्डाण उद्योगात नव विकास आणि नव कल्पना यांची तरतूद करण्याची एक सुवर्णसंधी राहील. देशांतर्गत विमान उद्योगांना या एरो शो मुळे उत्तुंग विकासाच्या संधी मिळणार असून मेक इन इंडियासाठी ही पर्वणी राहील. सरकारच्या संरक्षण निर्मिती विभागाने हा एरो शो यशस्वी आणि निकालाभिमुख होणार असल्याची ग्वाही दिली आहे.