कोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’

कोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर’ या ऑनलाईन विशेष संवादातून ‘धर्मांतर बंदी’ची मागणी !*_

*कोरोना महामारीच्या काळातही ख्रिस्ती मिशनरींद्वारे हिंदूंचे धर्मांतर हा मानवतेला मोठा कलंक !* – महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

कोरोनाच्या वैश्‍विक महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने सहयोग करण्याची आवश्यकता असताना या काळात ‘हिंदूंचे धर्मांतर करणे एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आहेत आणि तसा प्रयत्नही ते करत आहेत. हा मानवतेला एक मोठा कलंक आहे.

नैसर्गिक आपत्ती, युद्ध, नक्षलवाद चालू राहिल्यास हिंदूंचे धर्मांतर चालूच राहील, हीच इच्छा धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी बाळगून आहेत. हिंदूंच्या देवतांविषयी घृणा निर्माण करून आणि ‘ख्रिस्ती पंथ आचरणात आणून येशूचे नाव घेतल्यावर कोरोना तुमचे काही बिघडवू शकत नाही’, असे सांगत ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत,

असे गंभीर प्रतिपादन इंदौर येथील श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रमाचे महामंडलेश्‍वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र् की’ या कार्यक्रमांतर्गत ‘कोरोना महामारीमध्येही लाखो हिंदूंचे धर्मांतर : का आणि कसे ?’ या ऑनलाईन ‘विशेष परिसंवादा’त बोलत होते. हा कार्यक्रम ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून 14777 लोकांनी पाहिला.

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. चेतन जनार्दन या वेळी म्हणाले की, ‘अनफोल्डींग वर्ल्ड’ या संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डेविड रिव्हस् यांनी नुकतेच ‘आमच्या संस्थेच्या मार्फत कोरोनाच्या काळात भारतात एक लाख हिंदूंचे धर्मांतर केले गेले आणि चर्चद्वारे 50 हजार गावे दत्तक घेतली आहेत’ असे वक्तव्य केले. बायबलचे विविध भाषांत भाषांतर करण्याच्या नावाखाली या विदेशी संस्थेचे धर्मांतराचे काम आपल्या देशात चालू आहे.

अजूनही कोरोनावर आपण पूर्णपणे नियंत्रण मिळवले नसतांनाही आपल्या या स्थितीचा गैरफायदा घेऊन हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या संस्थांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी हिंदूंनी केली पाहिजे.

आंध्र प्रदेश येथील ‘हिंदु देवालय परीक्षण समिती’चे कृष्णा जिल्हा समन्वयक श्री. के. उमाशंकर म्हणाले, ‘चर्च आणि मशिदी यांना मिळालेला निधी त्यांच्या पंथाच्या प्रचारप्रसारासाठी वापरला जातो;

मात्र हिंदूंची मंदिरे नियंत्रणात घेऊन मंदिरांसाठीचा निधी सरकारी कामांसाठी वापरला जातो. भारताचे पुढे आणखीन 2-3 तुकडे झालेले बघायचे नसतील, तर देशांत ‘धर्मांतर बंदी’चा कायदा आणायला हवा. सध्याच्या स्थितीला विशेषतः आंध्र प्रदेशमध्ये जाती-पातीचे राजकारण करून हिंदूंचे मोठ्या संख्येने धर्मांतर होत आहे. आरोग्य अन् आर्थिक या विषयाला धरून ही धर्मांतरे होत आहेत.’

या वेळी मुंबई येथील वैद्यकीय तज्ञ डॉ. अमित थडानी म्हणाले की, रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर केले जाते. हे अनेकांना माहिती असूनही यावर खुली चर्चा होताना दिसत नाही.

जेव्हा यावर खुली चर्चा होईल. तेव्हा जागृती व्हायला वेळ लागणार नाही. हल्लीच ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी धर्मांतराचे खुले समर्थन केले आहे. अशी व्यक्ती पदावर कशी राहू शकते ? यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातही जागृती करण्याची गरज आहे

Leave a Reply

Your email address will not be published.