म्हाडा’च्या मुंबईतील ४ हजार ८३ घरांसाठीच्या नोंदणी प्रक्रियेस सोमवारपासून सुरूवात, १८ जुलै रोजी सोडत
मुंबई दि.२० :- ‘म्हाडा’च्या मुंबईतील ४ हजार ८३ घरांसाठी २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून याच दिवसापासून नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया २६ जूनपर्यंत सुरू राहणार असून १८ जुलै रोजी वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे.
नालेसफाईच्या कामाबाबत नागरिकांकडून अभिप्राय मागवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अत्यल्प गटासाठी २ हजार ७८८, अल्प गटासाठी १ हजार २२, मध्यम गटासाठी १३२ आणि उच्च गटासाठी ३९ घरे आहेत. सोडतीमधील अत्यल्प गटात गोरेगावमधील पहाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील १ हजार ९४७, अॅन्टॉप हिलमधील ४१७ तर, विक्रोळीच्या कन्न्मवार नगरमधील ४२४ अशी एकूण २ हजार ७८८ घरे समाविष्ट आहेत. तर, अल्प गटात एकूण १०२२ घरे असून गोरेगावमधील पहाडी परिसरातील ७३६ घरांचा त्यात समावेश आहे.
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेची अभय योजना – मालमत्ता कराची सुमारे अठराशे कोटीची थकबाकी
उर्वरित घरे दादर, साकेत सोसायटी (गोरेगाव), गायकवाड नगर (मालाड), पत्राचाळ, जुने मागाठाणे (बोरिवली), चारकोप, कन्नमवार नगर, विक्रांत सोसायटी (विक्रोळी), गव्हाणपाडा आदी ठिकाणची आहेत. मध्यम गटासाठी मंडळाने १३२ घरे उपलब्ध करून दिली असून ही घरे दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर), कांदिवली येथील आहेत. तसेच उच्च गटासाठी केवळ ३९ घरांचा समावेश असून ही घरे ताडदेव, लोअर परळ, शीव, शिंपोली, तुंगा पवई आदी ठिकाणी आहेत.