कल्याण ; मायलेकीचा पोलीस स्थानकासमोर धिंगाणा
कल्याण दि.०४ – एका महिलेस गुन्ह्यात अटक करून पोलीस स्थानकात आणले असता महिलेने व तिच्या मुलीने पोलीस स्थानाकासामोरच महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी जयश्री मुदलियार व मुलगी मालती मुदलियार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस स्थानकात कार्यरत असणारऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीता राजपूत यांनी शनिवारी एका गुन्ह्यात कोळशेवाडी परिसरत राहणा-या महिला आरोपी जयश्री मुदलियार यांना अटक करत याबाबत तिच्या मुलीला माहिती दिली.
हेही वाचा :- डोंबिवली ; रिक्षा चालक व दुचाकीस्वराच्या भांडणात त्रिकुटाने दुचाकी केली लंपास
त्यामुळे संतापेल्या या दोन्ही माय लेकीनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीता राजपूत, हवलदार परदेशी, पोलीस नाईक कांगणे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तुला काही अधिकार नाही तुला बघून घेईन, माझी मंत्रालयात ओळख आहे, तुझी वरिष्ठाकडे तक्रार करेन, नोकरी करू देणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी जयश्री मुदलियार व मुलगी मालती मुदलियार विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.